BRO Recruitment 2023 | (BRO) सीमा रस्ते संघटनेत 567 जागांसाठी भरती; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!

20230103 150339 min

BRO Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, (Border Roads Organization) सीमा रस्ते संघटना अंतर्गत “रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW मेस वेटर” पदांच्या एकूण 567 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

BRO Bharti 2023

BRO Vacancy 2023 : तरूणांनो पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.bro.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा.

पदाचे नाव : रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG), वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, एमएसडब्ल्यू पेंटर, MSW मेस वेटर

✍ पदसंख्या : एकूण 567 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रेडिओ मेकॅनिक02
2ऑपरेटर कम्युनिकेशन154
3ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG)09
4व्हेईकल मेकॅनिक236
5मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर)11
6मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)149
7मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर)05
8मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)01
Total 567

शैक्षणिक पात्रता : खाली सविस्तर वाचा

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता : खाली सविस्तर वाचा

विभाग उंची (सेमी)छाती (सेमी)वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश15875 Cm + 5 Cm expansion47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश15275 Cm + 5 Cm expansion47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र162.576 Cm + 5 Cm expansion50
पूर्व क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
मध्य क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
दक्षिणी क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
गोरखास (भारतीय)15275 Cm + 5 Cm expansion47.5

➡ वयोमर्यादा : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.5 ते 8: 18 ते 25 वर्षे
  • ✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
  • ☢ परीक्षा शुल्क : General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन

✈ अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015/ कमांडंट, BRO शाळा आणि केंद्र, दिघी कॅम्प, पुणे – 411 015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form) : येथे पाहा

👉 फी भरण्याची लिंक : येथे पाहा

How To Apply For Border Roads Organization Jobs 2023

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
  • कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
  • फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top